crime news crime news
पुणे

पुणे : सवलतीच्या दरातील जेवणाची थाळी पडली दीड लाख रुपयांना

स्वादिष्ट पक्वानांच्या चवीऐवजी पळविले तोंडचे पाणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घरबसल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायला कोणाला आवडत नाही, अशाच स्वादिष्ट जेवणाच्या थाळीसाठी एका महिलेला फोनवरुन सवलत असल्याचे सांगितले. महिलेनेही सवलत मिळाल्याचे ऐकून तत्काळ संबंधीत व्यक्तीने पाठविलेल्या लिंकला प्रतिसाद दिला आणि काही कळण्याच्या आतच महिलेच्या बॅंक खात्यातील दिड लाख रुपये लंपास झाले. थाळीतील स्वादीष्ट पक्वानांची चव तर सोडाच, पण बॅंक खात्यातील दिड लाख रुपये गेल्यानंतर मात्र महिलेच्या तोंडचे पाणी पळाले.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला हडपसरमधील मगरपट्टा परिसरात राहतात. 6 मार्च 2021 या दिवशी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला. शहरातील एका नामांकित हॉटेलची जेवणाची थाळी सवलतीच्या दरात मिळत असल्याचे त्याने फिर्यादीस सांगितले. थाळीची आगाऊ नोंदणी करण्यासाठी आपण पाठविलेल्या लिंकला प्रतिसाद देण्याची सुचना त्याने केली.

त्यानुसार, महिलेने त्याने मेसेजद्वारे पाठविलेल्या लिंकवर आपली वैयक्तीक माहिती भरली. दरम्यान, आरोपीने महिलेला काही वेळ बोलण्यामध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर काही वेळाने महिलेला तिच्या बॅंक खात्यातील एक लाख 44 हजार रुपयांची रक्कम अनोळखी व्यक्तीने काढून घेतल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजु अडागळ करीत आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरामध्ये ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना वाढत असल्याची सद्यस्थिती आहे. परदेशातून भेटवस्तू, बॅंके खाते अद्यायावत करणे, गुंतवणुकीसह विविध प्रकारचे आमिष दाखवून नागरीकांची लुबाडणूक करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

अशी घ्या काळजी

  • अनोळखी व्यक्तींच्या फोन, मेसेजला प्रतिसाद देऊ नका

  • अनोळखी ईमेल, लिंकला प्रतिसाद देण्याचे टाळा

  • अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका

  • सवलतीच्या किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

  • आर्थिक व्यवहार करण्यापुर्वी कुटुंबीयांशी चर्चा करा

  • फसवणूक होण्याची चिन्हे दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नांदेडमध्ये संभाजी बिग्रेड आक्रमक

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT