Chaitanya Wadekar Maharaj sakal
पुणे

Chaitanya Wadekar Maharaj : चोर सोडून सन्याशाला फाशी ? चाकण पोलिसांवर कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकरांचा आरोप

Pune Police: घटनांमुळे सामान्य नागरिकांना पोलीस खात्याविषयी विश्वास निर्माण होण्याऐवजी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chakan: येथे डिझाइन क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या भावाला चाकण पोलिसांनी इन्स्टीट्यूटच्या ऑफीसमधून कोणत्याही प्रकारची माहिती न देता धमकावून ताब्यात घेतले आणि त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेत दमदाटी केली व दुचाकी वरुन पोलिस स्टेशनला नेले.

पोलिसांकडे तक्रार आणि तक्रार करणारा यापैकी दोन्हीही नसल्याचे उघड झाल्यानंतर युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

चाकण येथे वाडेकर महाराजांच्या भावाचे सयाजी डिझाईन या नावाने व्यवसाय आहे. काल ( दि.२९ ) चाकण पोलिसांनी प्रमोद वाडेकर यांना मुलांचा वर्ग सुरू असताना ताब्यात घेतले आणि पोलिस स्टेशनला नेले. हे समजल्यानंतर चैतन्य महाराज वाडेकर चाकण पोलिस स्टेशनमध्ये गेले असता भावाच्या विरोधात तक्रार आणि तक्रारदार नसल्याचे त्यांना समजले.

संबंधित व्यक्ती तुमचे भाऊ आहेत याबाबत आम्हाला माहीत नव्हते असे सांगत संबंधित पोलिस बाहेर निघून गेले असे ही वाडेकर महाराज यांनी सांगितले.तसेच याबाबत आम्ही चाकण पोलीस स्टेशनचे एक अधिकारी आणि तीन कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दिली असल्याचे सांगितले.

याबाबत चाकण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की येथे दिले जात असलेले शिक्षण आणि होत असलेली दमदाटी याबाबत काही विद्यार्थ्यांची तक्रार होती. आणि त्याबाबत चौकशी करण्यासाठी आमचे कर्मचारी तेथे गेले होते.याबाबत गैरसमज झाले आहेत.

दरम्यान समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या पोलीसांवर आहे तेच पोलीस कायद्याचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी करत असल्याचे यामधून दिसत आहे.अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांना पोलीस खात्याविषयी विश्वास निर्माण होण्याऐवजी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT