Pune Crime accused drug smuggling case pune escaped sassoon hospital marathi news Sakal
पुणे

Pune Crime : पुण्यातील ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपीचे ससून रुग्णालयातून पलायन

पुण्यात रविवारी २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले

अक्षय बडवे

पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देवून पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ललित पाटील याच्यावर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयातील वॉड क्रमांक १६ मध्ये दाखल केले होते.

परंतु ललित पाटील हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कामगार रौफ रहीम शेख आणि सुभाष जानकी मंडल या दोघांच्या मदतीने मेफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करीत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरातून शेख आणि मंडल यांना शनिवारी अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

या घटनेनंतर पाटील याला आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक्स रे काढण्यासाठी नेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांना चकवा देवून त्याने पलायन केले. दरम्यान, रात्री आठ वाजता एक्स रे काढण्यासाठी नेणे आणि पोलिसांचा बंदोबस्त असताना आरोपीने पलायन कसे केले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘‘या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT