police bribe sakal
पुणे

Pune Bribe : शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराविरुध्द गुन्हा

शेतकऱ्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यातील हवालदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शेतकऱ्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यातील हवालदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - शेतकऱ्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यातील हवालदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.

रामदास लक्ष्मण जाधव असे त्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. शेतजमिनीच्या वादातून भिगवण पोलिसांनी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जप्त केला होता. ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर हवालदार जाधव याने शेतकऱ्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. परंतु तडजोडीनंतर २० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले.

या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये पोलिस हवालदार जाधव याने तक्रारदार शेतकऱ्याकडून २० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT