crime esakal
पुणे

Pune Crime : बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

सकाळ वृत्तसेवा

व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

पुणे - व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी देवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात एका ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी जुगनू ऊर्फ शफीक शेख (वय ४५) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी जुगनू शेख हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी आणि शेख यांच्यात २०२० मध्ये भिशीचा व्यवसाय होता. तो बंद झाल्यामुळे आरोपीने फिर्यादी महिलेला दुसरा व्यवसाय सुरू करू, असे सांगितले. त्यासाठी आरोपीने २०२०-२१ या कालावधीत फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीकडून वेळोवेळी ४ कोटी रुपये घेतले. परंतु त्यांना काहीही पैसे न देता आर्थिक फसवणूक केली.

फिर्यादी त्यांचे पैसे मागण्यासाठी शेख याच्या कोंढवा येथील घरी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. इतर आरोपींनी त्यांचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर पुन्हा आरोपी शेख याने जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT