Court esakal
पुणे

Pune Crime : ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाऊ आणि पुतण्याला सात वर्षे सक्तमजुरी

जनावरे चारण्यावरून झालेल्या वादात वहिनीला शिवीगाळ केल्याबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या भावावर कुऱ्हाडीने वार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जनावरे चारण्यावरून झालेल्या वादात वहिनीला शिवीगाळ केल्याबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या भावावर कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाऊ आणि पुतण्याला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.

किसन सुखदेव दुर्गे (वय ६१) आणि त्याचा मुलगा माधव दुर्गे (वय ३१, दोघेही, रा. दुर्गे वस्ती, निमोणे, ता. शिरूर) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. बाळासो सुखदेव दुर्गे हे या घटनेत जखमी झाले होते. त्यांची आई ताराबाई दुर्गे यांनी याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळासो आणि किसन हे दोघे भाऊ आहेत.

दोन नोव्हेंबर २०१२ रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणात सहायक जिल्हा सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी सात साक्षीदार तपासले. जखमी आणि फिर्यादी यांची साक्ष गुन्हा शाबीत करण्यासाठी महत्त्वाची ठरली. पोलिस निरीक्षक ए. बी. जगदाळे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, पुणे सत्र न्यायालय पैरवी अंमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचीत आणि न्यायालय पैरवी कर्मचारी पोलिस रेणुका भिसे, एस. बी. रणसर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

घटनेच्या एक दिवस आधी सामाईक क्षेत्रात जनावरे चारताना किसन आणि बाळासो या दोघांच्या पत्नीत शाब्दिक वाद झाले. याचा जाब विचारण्यास बाळासो गेले होते. त्यावेळी किसन त्याने त्यांना मारहाण केली. तर माधव हा कुऱ्हाड घेऊन गेला. कुऱ्हाडीने वार करून त्यांनी बाळासो यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Muhurat Trading : दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टी वधारले, अनेक शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक

Eknath Shinde: जालन्यात शिंदेसेनेला मोठं भगदाड! सर्व तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, कार्यपद्धीवर नाराज

IND U19 vs PAK U19: सेहवाग-द्रविड स्वस्तात बाद, पण अर्जुन राजपूतचं खणखणीत शतक; भारताच्या पाकिस्तानविरुद्ध २०० धावा पार

Latest Marathi News Live Update: : पंतप्रधानांनी बस्तरमधील कोब्रा (CoBRA) ऑपरेशन्स बेसला भेट दिली

Dalit Files Novel by Sharankumar Limbale : ‘दलित फाइल्स’मध्ये जातीय अन्यायाच्या जखमा आणि शिक्षणासाठीचा संघर्ष कसा मांडला?

SCROLL FOR NEXT