पुणे

Pune Crime : पुण्यात चक्क "काजू कतली"साठी तरुणांचा गोळीबारचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये...

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. परिसरातील स्वीटमार्टमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ तरुणांना अटक केली. सुरज ब्रह्मदेव मुंडे, असं आरोपीचं नाव असून एक आरोपी त्याचा साथीदार अल्पवयीन आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवर असलेल्या जोधाराम चौधरी यांच्या फुलपरी स्वीट मार्टमध्ये घुसून या दोघांनी एक किलो काजू कतली फुकट मागितली. परंतु चौधरी यांनी पैसे मागितले असता त्या दोघांना या गोष्टीचा राग आला. त्यानंतर सुरज आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्या जवळील पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जवळील पिस्तूल जुने असल्याने राऊंड फायर झाले नाही. मात्र दहशत निर्माण व्हावी म्हणून त्यांनी के कृत्य केले.

दहशत निर्माण करून ते दोघेही तिथून पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे या दोघांनाही अटक केली. भारतीय दंडात्मक कलम ३०७ आणि खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT