pune crime branch unit 5 succeeded solve murder case wanwadi  Sakal
पुणे

Pune Crime : वानवडीतील खुनाचा उलगडा; मेहुण्यानेच काढला काटा

Pune Murder Case : वानवडीतील लुल्लानगर भागात लष्कराच्या मोकळ्या जागेत झालेल्या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime : वानवडीतील लुल्लानगर भागात लष्कराच्या मोकळ्या जागेत झालेल्या तरुणाच्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला यश आले आहे. बहिणीला तिचा नवरा त्रास देत असल्याच्या कारणातून मेहुण्याने दाजीचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे.

माविया लियाकत हुसेन पठाण (वय २३, रा. अश्रफनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सोमवारी (ता. २४) रात्री अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती.

याप्रकरणी, गुन्हे शाखेने अरविंद अमृत कांबळे (वय २६, रा. गुलटेकडी), रोहीत हनुमंत पुटगे (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज) या दोघांना अटक केली आहे. कांबळे हा यातील मुख्य सूत्रधार आहे. कांबळे जीम ट्रेनर असून, त्याच्यावर बिबवेवाडी, मार्केट यार्ड आणि वाकड पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT