cash seized  sakal
पुणे

Pune : संशयित कारमधून साडेतीन कोटींची रोकड जप्त,पुणे पोलिसांची कारवाई

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हडपसर परिसरात एका कारमधून पुणे पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटींची रोकड जप्त केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचसह लोणी काळभोर वाहतूक पोलिस आणि हडपसर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

ही रोकड कशासाठी, कोठे नेली जात होती, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत धनपाल गांधी (वय ४७, रा. लासूरणे, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी (ता. ८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखा, लोणी काळभोर पोलिस ठाणे, हडपसर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाच यांनी संशयित कार (क्रमांक एमएच १३ सीके २१११) ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीला हडपसर पोलिस ठाण्यात आणले.

कारमधील बॅगा तपासल्या. त्यावेळी बॅगांमध्ये तीन कोटी ४२ लाख ६६ हजारांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करून सीलबंद करण्यात आली आहे. तसेच, वाहन जप्त करण्यात आले आहे.याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, प्राप्तिकर विभागाला पुढील कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

चौकशीदरम्यान, प्रशांत गांधी यांनी ही रक्कम घरातून पुण्यातील लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत कर्जापोटी भरण्यासाठी जात असल्याचे पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT