crime  esakal
पुणे

Pune Crime : रिक्षाचालकाने भर रस्त्यात महाविद्यालयीन तरुणीचा केला विनयभंग, पोलिसांकडून अटक

रिक्षाचालकाने एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

सकाळ वृत्तसेवा

रिक्षाचालकाने एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पुणे - रिक्षाचालकाने एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन संजय जगताप (वय ३९, रा. कोंढवे धावडे) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी कोथरूड परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती कोथरुड परिसरातून गुरुवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता रिक्षाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे निघाली होती.

त्यावेळी रिक्षाचालकाने विद्यापीठाजवळ रस्त्यातच रिक्षा थांबवून तरुणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने रिक्षाचालकाला विरोध करून ती रिक्षातून बाहेर पडली. परंतु रिक्षाचालकाने तिला धमकावून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. या घटनेनंतर तरुणीने चतु:शृंगी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पसार झालेल्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT