Crime News sakal
पुणे

Pune Crime : पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

माहेरहून ५० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

माहेरहून ५० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे - माहेरहून ५० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी पतीसह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका विवाहितेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार चिंचवड परिसरात नोव्हेंबर २०२० ते ३० मे २०२१ या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुजर शेख याचा दोन वर्षांपूर्वी एका तरुणीसोबत विवाह झाला होता.

अबुजरने व्यवसाय सुरु करण्यासाठी पत्नीला माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. परंतु पैसे न दिल्यामुळे पतीसह नातेवाइकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला.

पतीने भांडणात रागाच्या भरात पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत तुला कोठे जायचे तेथे जा सांगितले. त्यामुळे ती गर्भवती अवस्थेत वडिलांच्या घरी निघून आली. याबाबत पत्नीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT