cyber crime sakal
पुणे

Pune Cyber Crime: 40 लाखांच्या कर्जासाठी तरुणानं गमावलं २७ लाख; वाचा काय घडला प्रकार?

पुण्यात दिवसेंदिवस सायबर चोरीच्या घटनांमध्ये वाढ

रुपेश नामदास

पुण्यात दिवसेंदिवस सायबर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आशातच पुन्हा एकदा सायबर चोरट्यांनी आय टी कंपनी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला २७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. एका आय टी कंपनीमध्ये काम करत असलेल्या तरूणाचे २ वर्षापूर्वी त्यांचे वडील आजारी होते.

तसेच त्यांची पत्नीविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा टोठवला होता या दरम्यान पैश्यांची गरज असल्याने कमी व्याज दरात ४० लाख रुपये देतो असे एका फायनान्स कंपनीकडून त्यांना सांगण्यात आलं.

कर्जासाठी त्यांच्याकडून सगळी कागदपत्रे घेण्यात आली इतकंच नाही तर कर्जासाठी प्राथमिक रक्कम म्हणून दीड लाख रुपये ऑनलाईन पाठवा असे सांगितले. सायबर चोरट्यांनी शिताफिने त्यांचा विश्वास बसावा यासाठी एक लोन नंबर दिला आणि बँकेचा कॅन्सल चेक देखील मागवण्यात आला.

हेही वाचा-जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

त्यानंतर नॉमिनी, लोन amount disbursement चार्ज, विमा पॉलिसी, जी एस टी अशी वेगवेगळी कारणे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले.

अशा प्रकारे ४० लाख रुपयांच्या कर्जासाठी त्यांची तब्बल २७ लाख ४५ हजार ६५५ रुपये सायबर चोरट्यांनी उकळले त्यानंतर आपल्याच बँकेतील रक्कम संपत होत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

हा संपुर्ण प्रकार मार्च २०२० ते मे २०२२ दरम्यान घडला आहे. वडिलांचे आजारपण आणि पत्नीविरोधातील घटस्फोटाचा खटला न्यायालयात असल्याने त्यांला पैशांची सतत गरज लागत होती.

ती भागवण्यासाठी ४० लाखांचे कर्ज काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुणाला हा गंडा घालण्यात आला आहे. याबाबत तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT