pune crime Decomposed body found Khadakwasla Dam pune
pune crime Decomposed body found Khadakwasla Dam pune sakal
पुणे

Pune Crime : खडकवासला धरणात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

निलेश बोरुडे

सिंहगड: खडकवासला धरणाच्या पाण्यात एनडीए-बहुली रस्त्यावरील कुडजे गावच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे असावे असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पीएमआरडीए च्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला खडकवासला धरणाच्या पाण्यावर कुडजे गावच्या हद्दीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पुणे शहर अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून मिळाली.

पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल रोकडे, किशोर काळभोर, श्रीकांत आढाव, सूरज इंगवले व विशाल घोडे या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू केली. ज्या ठिकाणी मृतदेह तरंगत होता त्या ठिकाणी उतरणे अवघड असल्याने नौदलाच्या बोटीने अग्निशमन दलाचे जवान मृतदेहाजवळ पोहोचले व मृतदेह पाण्याबाहेर काढला.

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून याबाबत पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली आहे.

मृतदेह वाहत आला असावा....... ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता तेथे उतरणे शक्य नसल्याने व तेथे संबंधित व्यक्तीचे कपडे किंवा इतर वस्तू दिसून न आल्याने मृतदेह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील इतर ठिकाणाहून वाहत येऊन येथे खडकाजवळ अडकला असावा असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत असून मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT