crime sakal
पुणे

Pune:पोलिस असल्याचे भासवून अमेरिकन डॉलर लंपास

तपासणी करण्याच्या बहाण्याने हॅंडबॅगमधील चार हजार अमेरिकन डॉलर घेवून चोरटे पसार झाले.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - चोरट्यांनी पोलिस असल्याचे भासवून हॅंडबॅगमध्ये गांजा असल्याचे सांगून तपासणी करण्याच्या बहाण्याने बॅगेतील चार हजार अमेरिकन डॉलर (सुमारे तीन लाख २० हजार रुपये) लंपास केले.

याप्रकरणी कोंढव्यातील मिठानगर येथील एका ५८ वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील पारगेनगरमधील वेलकम हॉल चौकात ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी अरेबिया रेस्टॉरंट येथे रात्री जेवण करुन घरी परतत होते. ते वेलकम हॉल चौकात आले.

त्यावेळी मोटारीतून आलेल्या तिघांपैकी एकाने ओळखपत्र दाखवून पोलिस असल्याचे सांगितले. त्यांच्याजवळ हॅंडबॅगेत गांजा असल्याचे सांगत तपासणीसाठी फिर्यादीकडील हॅंडबॅग घेतली. तपासणी करण्याच्या बहाण्याने हॅंडबॅगमधील चार हजार अमेरिकन डॉलर घेवून चोरटे पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT