Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : लष्करी गणवेश परिधान करून फसवणूक करणाऱ्या तोतया सुभेदारास अटक

त्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-दोन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून तोतया सुभेदाराला चिखली येथून ताब्यात घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime - भारतीय सैन्य दलात असल्याचे सांगून लष्करी गणवेश परिधान करून लोकांची फसवणूक करणार्‍या तोतया सुभेदारास गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-दोन ने लष्करातील गुप्तचर विभागाच्या मदतीने अटक केली. हा तोतया सुभेदार सैन्य दलातून हवालदारपदाची नोकरी सोडून पळून आल्याचे तपासात समोर आले आहे.

प्रशांत भाऊराव पाटील (वय ३२, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मूळ रा. कुपटगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत पाटील हा सैन्य दलातील पॅरा मिलिटरी आसाम रायफल्समध्ये हवालदार पदावर काम करीत होता. २०१९ मध्ये सैन्य दलातून नोकरी सोडून आल्यानंतर तो सैन्यात सुभेदार असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करीत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

त्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-दोन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून तोतया सुभेदाराला चिखली येथून ताब्यात घेतले. त्याच्यावर यापूर्वी सिंहगड पोलिस ठाणे, वाकड, अहमदनगर येथे फसवणूक आणि लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

त्याच्याकडून आयफोनसह दोन मोबाईल, भारतीय सैन्य दलाचे दोन गणवेश, इतर साहित्य, तीन आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिस अंमलदार अमोल परशुराम पिलाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पाटील याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT