pune crime family beat auto mechanic for demanding his money of repair of auto rickshaw  sakal
पुणे

Pune Crime : ऑटो दुरुस्त केल्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मॅकॅनिकला लाथाबुक्क्यांनी मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

टीबीचा आजार असून छातीत ठोसा लागल्याने तो बेशुद्ध अवस्थेत

विठ्ठल तांबे

धायरी : ऑटो दुरुस्तीचे काम केल्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मॅकॅनिकला ३ महिलांसह ५ जणांनी लाथाबुक्याने मारहाण केली. त्यात बेशुद्ध पडून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.रईस अमीन शेख (वय ३० वर्ष, राहणारे मानाजी नगर, नवदीप सोसायटी, नऱ्हेगाव) असे त्याचे नाव आहे.

रईस शेख  याने शेजारी राहणारा नौशाद फारुक शेख याच्या ऑटो दुरुस्तीचे काम केले होते. त्याचे पैसे मागण्यासाठी रईस व त्याचा भाऊ अनिश शेख नौशाद याच्या घरी गेले असता त्यांच्यात वाद होऊन नौशाद शेख, जरीना शाहरुख शेख, अमिना नौशाद शेख, अल्ताफ शेख व मदिना शेख यांनी यांनी व रईस व अनिस शेख यांना जबरी मारहाण केली. दि.१७ रोजी पहाटे दीड वाजता रईस यास बेशुद्ध अवस्थेत नवले हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते.

रईस यास टीबीचा आजार असून छातीत ठोसा लागल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. आज रोजी सकाळी अकरा वाजता त्याचे पोस्टमार्टम झाले असून मरणाचे कारण "multiple blunt injuries " असे आले आहे. सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार  पेशंटचा जबाब घेण्यासाठी गेले असता पेशंट जबाब देण्याच्या परिस्थितीत नव्हता.

डॉक्टरांचा अभिप्राय घेऊन स्टेशन डायरी नोंद करण्यात आली होती. रईस यास ससून हॉस्पिटल येथे ऍडमिट केले असता काल, १९ मे रोजी रात्री तो मरण पावला. अनिस अमीन शेख याची फिर्याद घेऊन भादंवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मूळ राहणार गंगाखेड (परभणी जिल्हा) येथील असून त्यांना अटक करण्यासाठी एक टीम पाठविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Latest Marathi News Live Update : मतचोरीचा मुद्दा भरकटवण्यासाठी जरांगे पाटलांची ऑडिओ क्लिप बाहेर-नाना पटोले

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT