Pune Crime cctv viral video esakal
पुणे

Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा थेट डॉलर्सवर डल्ला; दाम्पत्याचे हिरे, सोन्याचे दागिनेही लुटले

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र

सकाळ डिजिटल टीम

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळख असणाऱ्या औंध परिसरात चोरीची घटना समोर आली आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरटे घरात घुसले आणि तब्बल 66 लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे. या चोरी प्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीने चतु:श्रुंगी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

चोरी झालेल्या ऐवजामध्ये पाच लाख रुपयांचे परकीय चलन त्याचबरोबर हिरे आणि सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे. जेवणासाठी बाहेर गेले आणि चोरट्यांनी घरच साफ केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची पिंपरी-चिंचवड परिसरात पॅकिंग करणारी कंपनी आहे. औंध येथील सिंध हौसिंग सोसायटी मध्ये त्यांचा बंगला आहे.

तर रविवारी ते दुपारी दिडच्या सुमारास ते कुटूंबासाबोत जेवण्यासाठी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी पाठिमागील दरवाजाने घरात शिरून परकीय चलन व डायमंड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६६ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ४ वाजता ते परतले तेव्हा त्यावेळी त्यांना दरवाजा उघडलेला असते, घरातील साहित्य व कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. या भागातील सी सी टिव्ही द्वारे चतु:शृंगी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

SCROLL FOR NEXT