pune crime fraud on pretext of conducting Chardham Yatra crime registered aganist 3 people  sakal
पुणे

Pune Crime : चारधाम यात्रा घडवण्याच्या बहाण्याने फसवणूक; ३ जणांवर गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिव व सतिश पाटील तपास करत आहेत. 

सकाळ वृत्तसेवा

धायरी : चारधाम यात्रेसाठी छप्पन हजार रुपये घेऊन यात्रा न घडविता फसवणूक केल्याप्रकरणी ड्रिमकास्टर टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या ३ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
रंजित तुलशीदास पवार ( वय ३८ वर्षे, रा. मु.पो. निगडी तर्फे सातारा) यांनी फिर्याद केली आहे. 

ऋषिकेश रामचंद्र भडाळे, संकेत रामचंद्र भडाळे व सुप्रिया संकेत भडाळे (सर्व राहणार धायरी) अशी आरोपींची नावे आहेत. धायरी येथे अजिंक्यतारा मित्रमंडळाजवळ असलेल्या ट्रॅव्हल्सचे ऑफिसमध्ये २६ फेब्रुवारी रोजी पवार यांच्याकडून बुकींग रक्कम  एकवीस हजार ऋषिकेश भडाळे यांनी घेतली.

त्यानंतर चारधाम यात्रेसाठी संकेत भडाळे यांनी वेगवेगळे मेसेजेस पाठवून विश्वास संपादन केला. संकेत यांची पत्नी सुप्रिया संकेत भडाळे यांनी खात्याचा क्यूआर कोड पाठवुन त्यावर उर्वरित पस्तीस हजार रुपये पाठवण्यास सांगितले. यात्रा न घडवता फसवणूक केली. फसवणूक झालेल्या १४५ नावे समोर आली आहे.

यामध्ये जवळपास चाळीस लाखापर्यंत ही फसवणूक झाली असून या शिवाय कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. या मधील नवी मुबंई ,पुणे, करमाळा, लोणावळा, परिसरातील फसवणूक झालेले लोक आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चंदनशिव व सतिश पाटील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT