Pune Crime gang terrorizing Sinhagad road area mocca action taken by police three arrested esakal
पुणे

Pune Crime News : सिंहगड रस्ता परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीवर मोका; तिघांना अटक

तिघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गतवर्षी १६ नोव्हेंबर रोजी आरोपी जामदारे याने एका तरुणावर हत्याराने वार करून गंभीर जखमी केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सिंहगड रस्ता भागात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार विनोद जामदारे याच्यासह टोळीतील तिघांच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली. या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबत आदेश दिले होते.

विनोद शिवाजी जामदारे (वय ३२, रा. सर्वोदय लॉन, वडगाव, मूळ रा. लोणारवाडी, जि. उस्मानाबाद), आकाश सुभाष गाडे (वय २१, रा. रामनगर, माणिकबाग, सिंहगड रस्ता), गणेश दिलीप म्हसकर (वय २३, रा. कुमार अपार्टमेंट, माणिकबाग, सिंहगड रस्ता, मूळ रा. आंबी, ता. पानशेत) अशी मोका कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

हे तिघेही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गतवर्षी १६ नोव्हेंबर रोजी आरोपी जामदारे याने एका तरुणावर हत्याराने वार करून गंभीर जखमी केले होते. तसेच, सिंहगड रस्ता भागातील वडगाव, धायरी, हिंगणे, माणिकबाग, दत्तवाडी, वारजे आणि हवेली परिसरात गुन्हे केले आहेत.

या संदर्भात सिंहगड रस्ता पोलिसांनी जामदारे आणि साथीदारांविरुद्ध मोका कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शहरातील दहा गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: जुन्नरच्या दिव्या शिंदेची 'बिग बॉस मराठी ६ मध्ये एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT