गुटखा पकडला Sakal
पुणे

गुजरातहून येणारा ११ लाखांचा गुटखा आळेफाटा पोलिसांनी पकडला

गुजरातहून अवैधरित्या गुटखा घेऊन येत असलेल्या कारला आळेफाटा पोलिसांनी धाडसाने पकडले.

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : गुजरातहून अवैधरित्या गुटखा घेऊन येत असलेल्या कारला आळेफाटा पोलिसांनी धाडसाने पकडले. या कारवाईत तब्बल ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी (२३ जानेवारी) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलिसांनी केली. (Pune District Crime News)

आळेफाटा पोलिसांनी या कारवाईत एक रेनॉल्ड कारसह शैलेश शशिकांत बनकर (वय ३६ रा. रानमळा, कडूस ता. खेड) आणि सचिन सखाराम सांडभोर (वय ३०, रा. दोंदे ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील पोलीस कर्मचारी पद्मसिंह अप्पाराव शिंदे पोलीस वाहनातून रविवारी पहाटे पुणे नाशिक महामार्गावर गस्त घालत होते. आळेखिंड येथून आळेफाट्याच्या दिशेने येत असताना पोलीस गाडी पाहून रेनॉल्ड कार नंबर एम.एच १२ टीएस १९४३ चालकाने सुसाट पळविली. पुढे पाठलाग केला असता गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र कारला काही अंतरावर धाडसाने अडवले.

अधिकची चौकशी केली असता गाडीमधील चालकाने आम्ही घाईत असून आम्हाला जाऊद्या अशी विनंती केली. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये खोके, मिक्स मोठे पोते आढळून आले. कार आळेफाटा पोलीस ठाण्यात आणून अधिकची चौकशी केली. या कारमध्ये विमल गुटखा सापडला. पोलिसांनी हा गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली कार असा ऐकून ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हि कामगीरी पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपपोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, विनोद गायकवाड, लहानु बांगर,भिमा लोंढे, अमीत वाळूंजे यांनी केली.

दरम्यान महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या गुजरातमधून आयात करून पुणे जिल्ह्यातील दुकानदारांना पुरवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ताब्यात घेतलेला आरोपींकडून अधिक चौकशीत याचा उलगडा होणार असल्याने जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT