crime news  sakal
पुणे

बायकोच्या माहेरच्यांचा पैशांसाठी तगादा; त्रासाला कंटाळून पतीने उचललं धक्कादायक पाऊल...

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे

रुपेश नामदास

Pune Crime: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यातील खडकी भागात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बायकोच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या ४ वर्षांपासून पत्नी आणि तिच्या माहेरचे लोक समीरला त्रास देत असल्याचे बोलले जाते. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव समीर नाईक असून वय वर्षे ३८ आहे.

या प्रकरणी मृत समीरचे वडील निवृत्ती नाईक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर नाईक यांचे उषा नावाच्या महिलेशी विवाह झाला होता. त्यांना १२ वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून उषा आणि तिच्या माहेरचे लोक समीरला वारंवार पैश्यांची मागणी करायचे आणि त्यावरून त्यांच्या मध्ये अनेक वेळा वाद देखील झाले होते.

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

काही रक्कम दिल्यानंतर सुद्धा उषा आणि तिच्या नातेवाईकांनी समीरला वारंवार आणखी पैश्याची मागणी केली. या गोष्टीचा मानसिक त्रास समीरला होऊ लागला आणि त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर यांच्या पत्नी उषा नाईक यासह सासरची मंडळी सरसाबाई पंढरकर, रामचंद्र पंढरकर, मालसिंग आढाव यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT