crime esakal
पुणे

Pune Crime : पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

पत्नीला देहविक्रय करण्यासाठी धमकावून मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पत्नीला देहविक्रय करण्यासाठी धमकावून मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

पुणे - पत्नीला देहविक्रय करण्यासाठी धमकावून मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याच्या दोन मित्रांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात एका २५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात पतीसह त्याचे मित्र आदित्य गौतम (रा. कसबा पेठ) आणि सुजित पुजारी (रा. आंबेगाव बुद्रूक) यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक आणि ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२० ते मे २०२२ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने पैशाची गरज भागवण्यासाठी पत्नीला मारहाण करून इच्छेविरुद्ध उंड्री-हांडेवाडी रस्त्यावर देहविक्रय करण्यासाठी उभे केले. त्यानंतर दोघा मित्रांसोबत पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, फिर्यादी महिला एके दिवशी रास्ता पेठेतून जाताना पतीच्या मित्रांनी तिला रस्त्या अडवले. या वेळी जातिवाचक शिवीगाळ करून व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT