Crime News sakal
पुणे

Pune Crime : अंगावर चटके, डोक्यात मारहाण...5 वर्षीय चिमूरडीची सावत्र आईकडून निर्घृण हत्या

श्वेताच्या शरीरावर मारहाण आणि चटके दिल्याच्या खुणा

सकाळ डिजिटल टीम

सावत्र आईने पाच वर्षांच्या मुलीला अंगावर चटके देऊन आणि डोक्यात मारहाण करून खून केल्याची घटना उत्तमनगर शिवणे भागात घडली. डॉक्टरांना संशय आल्यामुळे वैद्यकीय तपासणीत हा प्रकार उघडकीस आला.

श्वेता राजेश आनंद (वय ५) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी सावत्र आई रितिका सुनील बक्षी उर्फ रितिका राजेश आनंद (वय ३५, रा. धावडे इमारत, अहिरे गेट, उत्तमनगर, शिवणे) हिला अटक केली आहे.

याबाबत पोलिस हवालदार आनंद घोलप यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वेताचे वडील राजेश आनंद हे एका खासगी कंपनीत कामास आहेत. राजेशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजेशने रितिकासोबत दुसरा विवाह केला. श्वेताला आईची आठवण आल्याने ती रडायची. त्याचा राग धरून रितिका तिला गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंगावर चटके देऊन मारहाण करीत होती. मारहाणीत श्वेता बेशुद्ध पडली. त्यामुळे घाबरून रितिकाने श्वेताला ससून रुग्णालयात दाखल केले. श्वेताला फिट आल्यामुळे ती बेशुद्ध पडल्याचे तिने डाॅक्टरांना सांगितले. परंतु उपचारापूर्वीच श्वेताचा मृत्यू झाला होता.

श्वेताच्या शरीरावर मारहाण आणि चटके दिल्याच्या खुणा आढळून आल्या. डाॅक्टरांना संशय आल्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वैद्यकीय तपासणीत श्वेताचा मृत्यू डोक्यात मारहाण करून आणि अंगावर चटके दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी रितिकाला ताब्यात घेतले. पुढील तपास उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT