पुणे

Pune Crime : लैंगिक अत्याचार प्रकरणी कराटे शिक्षकास वीस वर्षे सश्रम कारावास

Latest Baramati News:

सकाळ वृत्तसेवा

Baramati : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल कृष्णा पांढरे (वय २७, रा. भिगवण, ता. इंदापूर) यास येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. ओ. शहापुरे यांनी वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

संबंधित अल्पवयीन मुलगी अमोल पांढरे याच्याकडे कराटे शिकण्यासाठी जात होती. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वैराग येथे पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीसह पीडित मुलीला ताब्यात घेतले. विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी सरकारच्या वतीने खटला चालविला. या प्रकरणात ११ साक्षीदार तपासले गेले.

पीडित मुलगी व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीच्या वतीने मुलगी स्वेच्छेने आल्याचा युक्तिवाद केला गेला, मात्र अल्पवयीन मुलीची संमती कायद्याने ग्राह्य धरता येत नाही, यात पिडीतेची संमती नव्हती, आरोपी विवाहीत असताना त्याने हे कृत्य केले होते. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा सादर केला गेला.

या खटल्यात न्यायालयाने आरोपीला ठोठावलेली दंडाची रक्कम पीडित मुलीस देण्याचा व सदरची रक्कम तुटपुंजी असल्याने जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिवांनी पिडीतेस कायद्यान्वये नुकसान भरपाई रक्कम देण्याची शिफारस न्यायाधिशांनी केली. या खटल्यात अॅड. स्वप्नील जगताप, फौजदार निश्चल शितोळे, कोर्ट पैरवी अधिकारी नामदेव नलवडे, फौजदार विजय झारगड यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT