अपहरण प्रकरण ई सकाळ
पुणे

पुणे : सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण

कोंढवा पोलिसांत पाचजणांवर गुन्हा : जबरदस्तीने ऐवज काढून घेत जीवे मारण्याची दिली धमकी

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील तब्बल ४ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी पाच जणांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र संगय्या हिरेमठ (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभय जोगदंड (वय ३०, रा. अपर डेपो, बिबवेवाडी), अभी बाळशंकर (वय ३२, रा. काकडेवस्ती, कोंढवा) आणि त्यांच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० सप्टेबर, १८ व १९ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी व कोंढव्यात घडला.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईल वर खेळलेल्या सट्ट्यामध्ये ३ लाख ९६ हजार रुपये हरले होते. हे पैसे परत देत नाही, म्हणून आरोपींनी प्रथम १० सप्टेबर रोजी त्यांना आमचे पैसे आताच्या आता दे नाही तर तुला उचलून नेतो व तुझे हात पाय तोडतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे फिर्यादी यांच्या पत्नी करुन फिर्यादीचा मोबाईल व पर्वतीतील जनता वसाहत येथे लावलेल्या भिशीच्या संबंधाने करायच्या केसची कागदपत्रे घेतली. फिर्यादी यांना चारचाकी गाडीत घालून त्यांचे अपहरण केले.

गाडीत पाईप़ कमरेचा पट्टा, वायर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशामधील अर्धा अर्धा तोळे वजनाच्या ८ सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल फोन व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावले असा १ लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT