Police esakal
पुणे

Pune Crime : पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा कट

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन लोखंडी कोयते, असा एकूण १०, ८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime - लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने रचलेला खुनाचा कट लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला. प्रणव भारत शिरसाट (वय २२, रा. आंग्रे वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), अभिजित अभिमन्यू आहेरकर (वय २२, कन्या शाळेजवळ, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक दत्तात्रय रामपुरे यास रेकॉर्डवरील आरोपी अक्षय कांबळे याने काही दिवसांपूर्वी मारहाण केली होती. अभिषेक हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील तडीपार गुन्हेगार प्रणव शिरसाट याच्या टोळीचा सदस्य असल्याने त्यांची पुन्हा भांडणे होऊन गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता होती.

पिस्तूल व कोयत्यासारखी घातक हत्यार घेऊन खुनाच्या उद्देशाने कदमवाकवस्ती परिसरात प्रणव शिरसाट येणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कदमवाकवस्ती येथे तपासणी केली असता, येथील पालखी विसावा शेडच्या जवळ टोळी प्रमुख प्रणव शिरसाट व अभिजित आहेरकर हे दोघे मोटारसायकलवर थांबले

पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला होता. तेव्हा त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, तीन लोखंडी कोयते, असा एकूण १०, ८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, प्रणव शिरसाट याने अभिजित आहेरकर, अभिषेक रामपूर व त्याच्या टोळीतील इतर सदस्यांच्या साथीने अक्षय कांबळे याचा खून करण्याचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT