Pune Crime Sakal
पुणे

Pune Crime : राहूत परप्रांतीय कामगाराचा खून; 'त्यामुळे' तपास लावणे यवत पोलिसांपुढे मोठे आव्हान

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे

संतोष काळे

राहू - नजीक सोनवणे डेअरी फार्म परिसरात एका परप्रांतीय कामगाराचा मृतदेह महादेव तुकाराम शिंगारे यांच्या विहिरीच्या पाण्यात तरंगताना आज ता. २४ सकाळी साडेनऊ वाजण्याच्या येथील काही कामगारांना आढळून आला.

राहूचे पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे.भिमकुमार अनिल यादव (वय ३०) मुळ राहणार जयपूर (ता. मेहंदीया) जि. आरवल , राज्य बिहार असे खून झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे.भिमकुमार हा सोनवणे डेअरी फार्म मध्ये कामगार म्हणून विजय उर्फ रामराव शहाजी सोनवणे यांच्या म्हशीच्या गोठ्यावर कामाला होता.

परप्रांतीय कामगाराचा नेमका खून कशामुळे व कोणत्या कारणांमुळे झाला याचा अद्याप उलगडा लागलेला नाही. याबाबत दौंडचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे , फौजदार संतोष कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे.

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. परंतु कामगारांची पोलीस स्टेशन दप्तरी मूळ मालकांनी अधिकृत नोंद केली नाही. त्यामुळे तपास लावणे यवत पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

प्रतिक्रिया -

खूणाच्या तपासासाठी चक्रे तातडीने फिरवली आहे. लवकरात लवकर खुनाचा धागेदोरा लागेल. पुढील तपास वेगाने सुरू आहे. हेमंत शेडगे - पोलीस निरीक्षक यवत (ता. दौंड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT