Pune Crime Sakal
पुणे

Pune Crime : मंगला चित्रपटगृहाजवळील खून टोळीयुद्धातून? दोघेजण ताब्यात

शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपटगृहाजवळ बुधवारी (ता. १६) पहाटे ही घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime News- ताडीवाला रस्ता येथील दोन गुंड टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून टोळक्याने तलवार, फरशी आणि कोयत्याने वार करुन एका तरुणाचा खून केला. शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपटगृहाजवळ बुधवारी (ता. १६) पहाटे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान शेख आणि विवेक नवधर ऊर्फ भोला या दोघांना ताब्यात घेतले आहे.

नितीन म्हस्के असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सतीश आनंदा वानखेडे (वय ३४, रा. खड्डा झोपडपट्टी, ताडीवाला रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (वय ३२), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (वय २४), इम्रान शेख (वय ३२), पंडित कांबळे (वय २७),

विवेक नवधर ऊर्फ भोला (वय २४), लॉरेन्स पिल्ले (वय ३३), सुशील सूर्यवंशी (वय ३०), मनोज हावळे ऊर्फ बाबा (वय २५), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (वय २४), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय २०), विवेक भोलेनाथ नवघरे (वय २७), अक्षय ऊर्फ बंटी साबळे (वय २१), विशाल भोले (वय ३०, सर्व रा. ताडीवाला रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला परिसरातील दोन गुंड टोळ्यांमध्ये वर्चस्वाच्या वादातून भांडणे होत होती. काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. सतीश वानखेडे आणि नितीन म्हस्के हे दोघे चित्रपट पाहण्यासाठी मंगला चित्रपटगृहात गेले होते.

यल्ल्या टोळीला त्याची खबर मिळाली होती. त्यामुळे ते चित्रपटगृहाच्या बाहेर दबा धरुन बसले होते. नितीन म्हस्के चित्रपटगृहाच्या बाहेर पडताच त्याला यल्ल्या टोळीतील आरोपींनी घेरले. त्याच्या डोक्यात, मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या आणि फरशीच्या तुकड्यांनी वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, विश्रामबागचे सहायक पोलिस आयुक्त वसंत कुवर, सहायक आयुक्त नंदा पाराजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, शब्बीर सय्यद घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड करीत आहेत. (Latest Marathi News)

दोन टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल.

- वसंत कुवर - सहायक पोलिस आयुक्त, विश्रामबाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT