Pune Crime News Esakal
पुणे

Pune Crime News: संतापजनक! वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाण्याने फसवलं! अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार

Crime News: पुण्यातील हडपसर येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील हडपसर येथून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मांजरी परिसरातील नदीपात्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात पोस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अनुराग साळवे आणि गणेश म्हेत्रे असे अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून पिडीत तरुणीच्या मैत्रीणीचे मित्र असलेल्या दोघा नराधम तरुणांनी अल्पवयीन मुलीवर मांजरीतील निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार केला व तिला तिथेच सोडून दिले.

आरोपींनी पीडित तरुणीला दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास नदीपात्रामध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून रात्रभर तिला नदीपात्रात सोडून दिले. गँगरेप प्रकरणात या दोन्ही आरोपी विरोधात पुण्यातील हडपसर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू, अशी धमकी देखील पीडितेला दिली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT