पुणे

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

दरोड्यात लाखोंचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली असून दुचाकीवरून आलेले आरोपी सोने घेऊन पसार झाले आहेत. वानवडी विभागाचे डीसीपी आर. राजा, गुन्हे शाखेचे डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

संतोष कानडे

पुणेः पुण्यामध्ये सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली असून दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचं दुकान लुटलं आहे. वानवडी पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पुण्यातील मोहम्मदवाडी रोडवर ही घटना घडली आहे. सात अनोळखी दरोडेखोरांनी मास्क लावून मोहम्मदवाडी रोडवर वारकर मळा येथील बीजीएस ज्वेलर्सवर दरोडा टाकून ३०० ते ४०० ग्राम सोने नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे शस्त्राचा धाक दाखवून सोने पळवले आहे.

दरोड्यात लाखोंचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली असून दुचाकीवरून आलेले आरोपी सोने घेऊन पसार झाले आहेत. वानवडी विभागाचे डीसीपी आर. राजा, गुन्हे शाखेचे डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे पोलिस आरोपीचा तपास करत आहेत. वानवडी पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT