Pune Metro Sakal
पुणे

Pune Crime News : मेट्रो सुरू व्हायच्या आधीच चोरट्यांनी मारला डल्ला; साहित्याची चोरी

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्यामाऱ्या आणि मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यामध्ये मेट्रो सुरू होण्याआधीच मेट्रोच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने एक लाखांचं साहित्य चोरुन नेलं आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पुण्यातल्या बंडगार्डन मेट्रो स्टेशन परिसरातून मेट्रो साहित्याची चोरी झाली आहे. या परिसरात रस्त्याच्या कडेला एक लोखंडी कंटेनर होता. या कंटेनरमधून अज्ञात चोरट्याने एकलाख ४२ रुपये किमतीचं साहित्य चोरून नेलं आहे. याप्रकरणी अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी तक्रार दिली आहे.

या चोरी प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंडगार्डन मेट्रो स्टेशन या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा करण्यात आला होता. चोरट्यांनी लोखंडी कंटेनर स्टोअरचे लॉक तोडून दहा इलेक्ट्रिक वायरचे बंडल, एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे १६ लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, तांब्याचे पाईप्स, कटर मशीन, ड्रिल मशीन असा एकूण एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

RCB vs GT Qualifier 1 : कागिसो रबाडाने इतिहास घडवला! मोहम्मद शमीचा विक्रम मोडला, शुभमन गिलच्या अफलातून झेलची हवा... Video

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेच्या 'या' मागण्या सरकार का स्वीकारत नाही? OPS बाबत महत्त्वाची माहिती...

School Notebook Price Hike : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना झटका! वह्या, पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ; जून महिना उजाडण्यापूर्वीच बजेट कोलमडणार

सूर्यकुमार यादव IPL 2026 नंतर आता, युगांडा संघाविरुद्ध ट्वेंटी-२० सामना खेळणार! मुंबईत ही मॅच कधी व केव्हा होणार?

SCROLL FOR NEXT