PMPML Kas Plateau tourism travel sakal
पुणे

Pune Crime : चालत्या बसमध्ये कंडक्टरकडून तरुणीचा विनयभंग; आरोपीला अटक

हा सगळा प्रकार दाते बस स्टॉप सहकारनगर ते के के मार्केट धनकवडी या दरम्यान घडला.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यामध्ये चालत्या बसमध्ये कंडक्टरने २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी या कंडक्टरला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत घडली. पीडित तरुणी पीएमपीएलने प्रवास करत होती. यावेळी बस मधील कंडक्टरने तिच्याशी लगट केली. ही घटना घडताच पीडित महिलेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला.

हा सगळा प्रकार दाते बस स्टॉप सहकारनगर ते के के मार्केट धनकवडी या दरम्यान घडला. पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत संबंधित पीएमपीएल बस कंडक्टरला ताब्यात घेऊन रात्री उशिरा विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

विश्वनाथ ठाकरे (४१) असे या बस कंडक्टर चे नाव आहे. पोलिसांकडून आधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर...; ममता बॅनर्जी संतापल्या

Rinku Singh Video: लवकरच येऊन जॉइनिंग लेटर घेईन'; रिंकू सिंहने योगींचे मानले आभार! उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसह नव्या इनिंगला सुरुवात

Hemant Godse Video Viral : भोंदूबाबा अशोक खरात माजी खासदाराचा हात बघून भविष्य सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल; लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा!

OMG! सनी लियोनीचं घर पाहिलत का? लक्झरी पॅलेस पाहून फराह खान झाली शॉक, करोडों खर्च करून बनवलेलं आलिशान घर

SCROLL FOR NEXT