Crime News
Crime News  
पुणे

Pune: पंखा सुरू करण्याच्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्याशी लगट करण्याचा सहायकाचा प्रयत्न; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा संगणक प्रयोगशाळेतील सहायकाने विनयभंग केल्याची घटना नऱ्हे परिसरात घडली. या प्रकरणी महिला कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

त्यावरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मणेश विठ्ठल कडू (वय ३५, रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही २९ वर्षीय महिला नऱ्हे भागातील एका महाविद्यालयात नोकरीस आहे.

महाविद्यालयातील संगणक प्रयोगशाळेतील कर्मचारी मणेश कडू याने त्या महिलेला विभाग प्रमुखांच्या खोलीतील पंखा सुरू करण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर त्याने महिला कर्मचाऱ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कडू याला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT