Pune Crime news 
पुणे

Pune Crime : पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना! एकाच कुटुंबातील चार जणांचे आढळले मृतदेह

अमर परदेशी, वरवंड

दौंड येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या चिठीच्या अनुषंगाने प्रथमदर्शी एकाने पत्नी व दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. 

पत्नी- पल्लवी-अतुल दिवेकर, वेदांतीका (मुलगी),अदत्विक (मुलगा) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर डॉ अतुल शिवाजी दिवेकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर येते. घटनास्थळी पोलीस अधिकारी व पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला आहे.

अतुल शिवाजी दिवेकर वरवंड येथील चैताली पार्क येथे कुटुंबासमवेत राहत होते. दुपारी बाजूच्या व्यक्तींनी घरात पाहणी केली असता त्यांना अतुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी खाली निपचीत पडल्याचे दिसून आले.

माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी अतुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. (pune crime news)

यावेळी पाहणीत घटनास्थळी चिठी सापडली. यामध्ये मी पत्नीचा गळा आवळून व दोन मुलांना विहिरीत टाकून  त्यांचा खून केला. तर मी स्वतः आत्महत्या करीत असल्याचे नमूद होते.

त्यानुसार पोलिसांनी संबधीत विहिरीच्या ठिकाणी पाहणी केली. विहिरीतील पाणी जास्त असल्याने मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT