periods google
पुणे

Pune Crime : जादूटोण्यासाठी महिलेचं मासिक पाळीचं रक्त विकलं; नक्की काय झालं? पोलीस म्हणाले...

हा विषय अधिवेशनातही मांडण्यात आला असून महिला आयोगानेही या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महिलेचं मासिक पाळीचं रक्त जादूटोण्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. ही महिला विवाहित असून सासरच्या मंडळींनीच हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी या २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१९ पासून सुरू होता. २७ वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. २ वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीच्या प्रेम विवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली.

सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळीदरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढून ते भरुन ५० हजारात जादूटोण्यासाठी विकलं. ही घटना या महिलेने आपल्या आईवडिलांना सांगितली, त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

ज्या दिवशी ही महिला पोलिसांकडे आली त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसंच हे अघोरी कृत्य बीडमध्ये घडलं असून गुन्हा दाखल करुन पुढचा तपास तिकडे करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT