Pune Crime News  Sakal
पुणे

Pune Crime News: लग्नानंतर पतीने घेतला चारित्र्यावर संशय अन्...; शेवटी तिने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Pune Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करत पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.

सनिल गाडेकर

पुणे, ता. ४ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करत पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मंगळवारी (ता. २) धनकवडी येथील राहत्या घरात आत्महत्या केली होती.

शिवानी दीपक दामगुडे (वय २४, रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती दीपक विठ्ठल दामगुडे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवानी यांचे वडील काशिनाथ काळू राऊत (वय ५० रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) यांनी बुधवारी (ता.३) सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे २०१९ मध्ये दीपक दामगुडे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पतीने शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने व कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तिला वारंवार शिवीगाळ करून सोडून देण्याची धमकी दिली. पतीकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून शिवानी यांनी मंगळवारी पतीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हडपसरमध्ये विवाहितेची आत्महत्या

पती व सासू-सासरे यांच्याकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानी सिद्धार्थ थोरात (वय २६) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. शिवानी यांनी सोमवारी (ता. १) हडपसर भागातील काळेपडळ येथील शिवराय कॉलनीत आत्महत्या केली.

त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सिद्धार्थ बिभीषण थोरात, सासू, सासरे बिभीषण थोरात (सर्व रा. शिवराय कॉलनी, काळेपडळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवानी यांचे वडील सुनील कामण्णा शिवपुजे (वय ५३, रा. पाटस ता. दौंड) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT