Crime 
पुणे

पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - सिंहगड रस्ता परिसरात नागरीकांना लुटण्याबरोबरच दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे. संबंधित टोळीकडून नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असल्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी "मोक्का'नुसार कारवाईचा बडगा उगारला आहे.

रोशन दयानंद लोखंडे (वय 21, रा. मानाजीनगर, नऱ्हे), प्रसाद अर्जुन धावडे (वय 20, रा.नांदेडगाव), वैभव अरुण तिडके (वय 21, रा. मानाजीनगर, नऱ्हे), पवन सुग्रीव बिराजदार (वय 24, रा. नऱ्हेगाव), फैजल फिरोज काझी (वय 21, रा.नऱ्हे) अशी "मोक्का'नुसार कारवाई केलेल्या सराईत गुंडांची नावे आहेत. लोखंडे टोळीविरुद्ध नागरीकांना अडवून लुटमार करणे, कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे काढून घेणे, तडीपार आदेशाचा भंग करून कोयता, बनावट पिस्तुल घेऊन नाच करणे, खंडणी मागून पैसे उकळणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी रोशन लोखंडे याच्या सांगण्यावरुन इतर आरोपींनी एकत्र येऊन हे गुन्हे केले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोशन लोखंडेविरुद्ध 2016 पासून विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे संबंधीत टोळीविरुद्ध 'मोक्का'नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी पोलिस उपायुक्तांकडे पाठविला होता. त्यानंतर संबंधीत प्रस्तावास अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी मंजुरी दिली.

आत्तापर्यंत गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध 21 "मोक्का' कारवाई
शहरातील कायदा-सुव्यस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व सहपोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी कडक कारवाई करण्याची भुमिका घेतली आहे. त्यानुसार, गुप्ता यांनी पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून आत्तापर्यंत 21 मोक्का कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांबरोबरच सराईत गुन्हेगारांनाही चांगलीच जरब बसली आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फरसावाले बाबा कोण? मृत्यूमुळे शिष्य आणि भाविक आक्रमक, महामार्ग रोखला

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

SCROLL FOR NEXT