Pune Crime News Esakal
पुणे

Pune Crime News: तंबाखू खायला दिली नाही म्हणून एकावर चाकूने पोटात सपासप वार; जीवघेण्या हल्ल्याने शहरात खळबळ

पुणे शहर परिसरात गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे शहर परिसरात गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळ तंबाखू न दिल्याच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गातून जाणाऱ्या एका व्यक्तीवर चाकूने पोटात वार केल्याची घटना घडली. तंबाखू न दिल्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात सूरज परताने (वय ३८, रा. परभणी) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज परताने हा केटरिंग व्यवसायात आहे. तो रात्री दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गातून जात होता. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने सूरजला तंबाखू मागितली. त्याने तंबाखू न दिल्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने सूरजच्या पोटात चाकूने वार केला. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला आहे.

जखमी सूरज परतानेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT