crime sakal
पुणे

Pune crime news : बारामतीत पोलीस व सराफा विरुद्ध बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल...

यांच्याविरुद्ध बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद संगई, बारामती

बारामती : एका महिलेस फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीतील सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणांमध्ये दोन पोलीस कर्मचारी, सराफ व त्याचा मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी शिवाजी राजाराम निकम, भरत ओसवाल, कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम, समीर शेख व दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामधील शिवाजी निकम हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात तर श्रीकांत निकम हे अकलूज पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत.

यामध्ये शिवाजी निकम, भरत ओसवाल यांच्याविरुद्ध बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर सर्वांविरुद्ध फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

80 तोळे सोने घेऊन त्या बदल्यात फक्त वीस लाख रुपये देऊन उर्वरित सोन्याचा अपहर करून फिर्यादीची फसवणूक केली, तसेच सोने परत देतो म्हणून शक्ती प्लाझा खाटीक गल्ली बारामती येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला व जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, तसेच कविता शिवाजी निकम, जीत ओसवाल, श्रीकांत राजाराम निकम व समीर शेख यांनी फिर्यादीस गरुड बाग येथे बोलावून जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली, अशा स्वरूपाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे याबाबत पुढील तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT