pune sakal
पुणे

Pune Crime News : लॅपटॉप चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; लोणीकंद पोलीसांची कामगिरी

सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) मारुती पाटील

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - खाजगी व महाविद्यालयीन वसतिगृहातुन लॅपटॉप चोरणार्या अट्टल गुन्हेगाराला लोणीकंद पोलीसानी जेरबंद केले. त्याच्याकडून 27 लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहे. 39 वर्षीय या चोराने चोरीचे 38 गुन्हे केले आहेत. जुगाराचे व्यसन असलेल्या या चोराने हे लॅपटॉप एक एक करून विकले होते.

निलेश प्रफुलचंद कर्णावट ( वय 39, पाचोरा तालुका, जिल्हा जळगाव ) असे जेरबंद केलेल्या चोराचे नाव आहे. लोणीकंद पोलीसात लॅपटॉप चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याअनुषंगाने पोलीसानी तपास सुरू केला. विविध तंत्रज्ञानाच्या आधारे त्याची माहिती काढून त्याचा शोध सुरू केला. रायसोनी कॉलेज रोडला तो उभा असल्याचे कळाल्यानंतर पोलीसानी त्याला सापळा रचून पकडले.

त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने वाघोली, सिंहगड रोड, लोणावळा, सिम्बायोसिस, देहू, बिबवेवाडी आदी ठिकाणाहून लॅपटॉप चोरल्याचे कबुल केले. त्याने हे लॅपटॉप एक एक करून वेगवेग ळया व्यक्तींना जळगाव जिल्ह्यात विकले होते. पोलीसानी त्या व्यक्तींच्या घरी जाऊन ते हस्तगत केले. सुमारे 11 लाख रुपये किमतीचे हे लॅपटॉप आहेत. ही कामगिरी परिमंडळ चारचे उपायुक्त शशिकांत बोराटे,

सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) मारुती पाटील, सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, रवींद्र गोडसे, पोलीस कर्मचारी स्वप्नील जाधव, बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, संदीप तिकोणे, सागर जगताप, विनायक साळवे, कैलास साळुंके, अमोल ढोणे, आशिष लोहार, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, साई रोकडे, दीपक कोकरे, शुभम चिनके, सचिन चव्हाण, प्रीतम वाघ, गहिनीनाथ बोमणे यांनी ही कामगिरी केली.

मार्च मध्ये कारागृहातून बाहेर

चोरीच्या गुन्ह्यात तो जून मध्ये कारागृहात गेला होता. मार्च 2023 ला बाहेर आल्यानंतर त्याने आठ महिन्यात 18 गुन्हे केले. त्यापूर्वी त्याने 21 गुन्हे केले आहेत.

असा करायचा चोरी तो महाविद्यालयीन

विद्यार्थ्यांसारखा राहायचा. सकाळी सात पूर्वीच तो एखादे वसतिगृह गाठायचा जिथे दरवाजा उघडा दिसेल तेथून लॅपटॉप चोरी करून सॅक मध्ये टाकून आरामशीर निघून जायचा. विद्यार्थी म्हणून कोणाला संशय यायचा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, निवृत्तीला उरलेले फक्त दहा दिवस; काय घडलं?

Jalgaon News : प्रेमविवाहाचा राग, तरुणाला नग्नावस्थेत खांबाला बांधून मारहाण; ५ जणांना अटक

Maharashtra News: वीज चोरी; गुन्हा आणि जीवाला धोका; भारतीय विद्युत कायदा २००३ अंतर्गत कठोर शिक्षा

Latest Marathi News Live Update : वर्धा-नांदेड महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक

SCROLL FOR NEXT