Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News: क्रूरतेचा कळस! आईनेच केली ४ वर्षीय पोटच्या पोरीची निर्घृण हत्या

पुण्यातील हडपसर भागात काल रात्री ही धक्कादायक घटना घडली

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime News: पुण्यातील हडपसर भागात काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी महेश वाडेर (वय ४) असे या चिमुरडीच नाव आहे. जन्मदात्या आईनेच चाकू खुपसून आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या संबंधी या लहान मुलीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र नेमकं तिने ही हत्या कुठल्या उद्देशाने केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. ती बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती यासाठी घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता.(Latest Marathi News)

शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. दरम्यान, घरमालक व शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळून आला. (Latest Pune News)

त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चिमुरडीचा खून करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

निर्दयी आईने त्या 4 वर्षाच्या चिमूरडीची हत्या का केली ही अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत. हा घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

SCROLL FOR NEXT