police bribed  esakal
पुणे

Crime News : तक्रार घेण्यासाठी लाच मागणारे तीन पोलिस हवालदार ‘ॲन्टीकरप्शन’च्या जाळ्यात

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मोटार अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस हवालदारांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका पोलिस हवालदाराला अटक केली आहे.

राजेंद्र दीक्षित, जयराम सावलकर आणि विनायक मुधोळकर अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी राजेंद्र दीक्षित यांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय २४) यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या मोटारीला झालेल्या अपघाताची तक्रार करण्यासाठी ते पोलिस ठाण्यात गेले.

त्यावेळी तिघा पोलिस हवालदारांनी त्यांच्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानुसार पडताळणी करून ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात सापळा रचला.

पोलिसांनी तक्रारदाराची मध्यरात्री तक्रार दाखल करुन घेतली. त्यानंतर पोलिस हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून १३ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी ‘एसीबी’च्या पथकाने दीक्षित याला ताब्यात घेतले. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, मुकुंद अयाचित, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर, पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली.

येरवडा पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर

एखाद्या नागरिकावर अन्याय झाल्यानंतर ते तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे जातात. परंतु तक्रार दाखल करून घेण्यासाठीच लाच मागितल्याचा आश्चर्यजनक प्रकार येरवडा पोलिस ठाण्यात समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दाद कोठे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तक्रार करण्यासाठी संपर्क साधा-

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय -

मोबाईल क्रमांक- ९९२३११५०५०

दूरध्वनी क्रमांक- ०२०- २६१३२८०२

ई-मेल dyspacbpune@gmail.com

टोल फ्री क्रमांक- १०६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात आयोगाचं मोठं पाऊल; पाचही राज्यांच्या मुख्य सचिवांना महत्त्वाचे निर्देश

Land Rover Defender: 'डिफेंडर' प्रेमींसाठी गुड न्यूज! गाडीची किंमत तब्बल ३४ लाखांनी कमी कशी झाली?

Scholarship Exam : इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २१ फेब्रुवारीला होणार

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक; महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 1694 मतांनी आघाडीवर

IND vs NZ T20: यांना रोखणं अवघड... किवी कर्णधाराची बोलती बंद; श्रेयस अय्यर म्हणाला, अभिषेक-वैभवने हे कसे केले याचे मला आश्चर्य

SCROLL FOR NEXT