crime esakal
पुणे

Pune Crime: दौंड हादरलं! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

रुपेश नामदास

पुण्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या साथीने हत्या केली आहे. शीतल सुनील जगताप असे आरोपी महिलेचे नाव आहे.

शीतल पतीसह पुण्यातील भांडगाव परिसरात राहायला होती. तिचे अतुल प्रभाकर चौगुले या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रमेसंबंधांना उडथळा ठरत असलेल्या पतीची झोपत असताना डोक्यात दगड घातून हत्या केली.

त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. आरोपी महिलेचा पती दारू पिवून मारहाण करायचा. याच त्रासाला वैतागून या महिलने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. यानंतर आरोपी महिलेने दोन दिवसांनंतर पती बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनीलचा मृतदेह घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आला. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

मृत सुनील जगताप याच्या डोक्याला जखम असल्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि पोलिसांनी तपासाची सुत्र फिरवत तक्रारदार पत्नीची कसून चौकशी केली असता तिने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली.

तर रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळुन पुरावा नष्ट केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.  या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT