pune crime news two criminals in Uttamnagar police station deported from three districts Sakal
पुणे

Pune Crime : उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार तीन जिल्ह्यांतून हद्दपार

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपायुक्तांचे आदेश

निलेश बोरुडे

सिंहगड: सध्या सुरू असलेला गणेशोत्सव व आगामी सणासुदीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे.

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी हे आदेश जारी केले असून गौरव गणेश धावडे व प्रसाद नवनाथ कोळी अशी हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या प्रस्तावावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरव धावडे व प्रसाद कोळी या दोघांवर खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, जमाव जमवून दहशत निर्माण करणे, महिलांची छेडछाड करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जामिनावर सुटून आल्यानंतरही या दोघांनी गुन्हेगारी कारवाया थांबविलेल्या नाहीत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्यात बदल झाला नाही.

पोलीस निरीक्षक किरण बालवडकर व शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे, पोलीस हवालदार तानाजी नांगरे, शिवाजी दबडे, पोलीस नाईक भाऊसाहेब हजारे,

पोलीस कॉन्स्टेबल समीर पवार , अनिरुद्ध गायकवाड, ज्ञानेश्वर तोडकर व परमेश्वर पाडाळे यांनी सराईत गुन्हेगार गौरव धावडे व प्रसाद कोळी यांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. कारवाईची माहिती मिळताच फरार झालेल्या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेऊन उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यापुढे हजर केले.

दोघांनाही पुणे शहर व पुणे जिल्हा, सोलापूर व सातारा अशा तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले असून गौरव धावडे याला नगर तर प्रसाद कोळी याला उस्मानाबाद येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT