पोलीस आल्याचे पाहताच चोरट्यांनी काढला पळ sakal
पुणे

Pune Crime: पोलीस आल्याचे पाहताच चोरट्यांनी काढला पळ

महंमदवाडीमधील मार्गोसा सोसायटीसमोरील रस्त्यावरील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : महंमदवाडीमधील मार्गोसा हाइट सोसायटीसमोरून मोटारसायकलवरून जात असताना तिघांनी कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तेथे पोलीस आल्याचे दिसताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. ही घटना शुक्रवारी (दि. १० डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

हातीम फ्रेमवाला (वय ४३, रा. कोंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हातीम फ्रेमवाला महंमदवाडीतील मार्गोसा हाइट सोसायटीसमोरील रोडवरून मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी तिघाजणांनी मोटारसायकल आडवी घालून कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यावेळी तेथून पोलिस आल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू

Sports News: महाराष्ट्र केसरी विजेत्यांचा शड्डू ऑलिंपिकमध्ये घुमेना, मराठी मल्ला मागे का पडतात?

Indian Theatre Documentary 1988 : भारतीय नाट्य परंपरेचा दस्तऐवज; जब्बार पटेल यांचा 'इंडियन थिएटर' लघुपट

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT