Betting  Sakal
पुणे

भारत-इंडीजच्या सामन्यावर ऑनलाईन बेटींग; सहा जणांना बेड्या

बेटींग करणाऱ्यांकडून सव्वा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारत व वेस्टइंडिज यांच्यातील T20 क्रिकट सामन्यावर ऑनलाइन बेटींग घेणाऱ्या सहा जणांना स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप, जुगाराचे व अन्य साहित्य असा सव्वा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुलटेकडी परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली.न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावलरी आहे. (Pune Crime News)

अंबादास चंद्रकांत तावस्कर (वय 23, रा. धाराशिव), समीर यशवंत जाधव (वय 41, रा. सोमवार पेठ), धनंजय सुर्यकांत गायकवाड (वय 34, रा. घोरपडी), अनिल रत्नाकर बलकवडे (वय 36, रा. सदाशिव पेठ), दिनेशकुमार मांगीलाल प्रजापती (वय 25), राहुल मीठालाल पालेवाल (वय 25, दोघेही रा. राजस्थान, जोधपुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मनोज भोकरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत व वेस्टइंडिय यांच्या दरम्यान बुधवारी रात्री टि-ट्‌वेंटी क्रिकेट सामाना होता. संबंधित क्रिकेट सामन्यावर गुलटेकडीतील एका सोसायटीजवळ असलेल्या खोलीमध्ये ऑनलाईन बेटींग सुरु असल्याची खबर स्वारगेट पोलिसांना मिळाली. त्यानुसार, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ व त्यांच्या पथकाने घटनेच्या ठिकाणी छापा घातला.

त्यावेळी संशयित आरोपी तेथे क्रिकेट सामन्यावर बेटींग करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांच्याकडील मोबाइल, लॅपटॉप, 13 हजार 900 रुपयांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. संबंधित आरोपींकडून त्यांच्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने घेतलेल्या सीमकार्डचा वापर करुन बेटींग करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात माहिती पुढे आली.

"क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटींग करणाऱ्यांना अटक केली आहे. त्यांनी यापुर्वीही बेटींग केली आहे का, त्यांच्या संपर्कात आणखी किती व्यक्ती आहेत व अन्य सखोल माहिती त्यांच्या चौकशीतुन पुढे येईल. त्यानुसार, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.''

-अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT