Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जमिनीच्या व्यवहारातील वादातून एकाचा धारदार हत्याराने वार करून खून केलेल्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जमिनीच्या व्यवहारातील वादातून एकाचा धारदार हत्याराने वार करून खून केलेल्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. सुरेश ऊर्फ बाळासाहेब बापूराव सातपुते (वय ६४, रा. बावधन) असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी ७ नोव्हेंबर २०१९ रोजी विलास पुंडलिकराव साबणे (वय ५१) यांचा खून केल्याचा आरोप होता. विद्या साबणे यांनी पौड पोलिसांत फिर्याद दिली होती.

सातपुतेने पैसे मिळाल्यानंतर जमीन द्यावी लागून नये म्हणून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले. पौडचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी विद्याधर निचीत आणि आकाश पवार यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. दंड भरल्यानंतर त्यातील दोन लाख रुपये साबणे यांच्या पत्नीला देण्यात यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले.

मुळशीमधील वळणे येथे राहणाऱ्या सातपुतेने जमीन विक्रीसाठी काढल्याची माहिती साबणे यांना मिळाली. त्यानुसार साबणे पती-पत्नी जमीन पाहण्यासाठी गेले. जमीन पसंत पडल्याने नऊ लाख १० हजार रुपये इतकी किंमत निश्चित झाली. पाच लाख रुपये सातपुतेला देण्यात आले. उरलेले पैसे खरेदीखत झाल्यावर एका वर्षाने द्यायचे ठरले होते.

मोजणी करायला बोलावून...

जमिनीची मोजणी ७ नोव्हेंबर २०१९ रोजी करायची आहे असे सातपुतेने साबणे यांना फोनवरून सांगितले. त्यानुसार साबणे मोजणीला गेले. त्यांनतर साबणे यांचा फोन बंद झाला. आरोपीचाही फोन बंद होता. पती न सापडल्याने साबणे यांच्या पत्नीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दरम्यान, पौड पोलिसांनी वळणे येथे एकाचा मृतदेह मिळाल्याची माहिती डेक्कन पोलिसांना दिली. तो मृतदेह साबणे यांचाच असल्याचे पत्नी आणि मुलाने ओळखले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT