Arrested 
पुणे

पालखी सोहळ्याच्या मानाच्या वादातून तरूणावर वार करणारे अटकेत

गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने पाच जणांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गावातील पालखी सोहळ्याचा मान घेण्याच्या वादातुन टोळक्‍याने तरुणाला पिस्तूलाचा धाक दाखवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने पाच जणांना अटक केली. यवत गावातील पालखीच्या मानाच्या वादातून हा प्रकार घडला होता. (Pune Crime News)

सागर माधवराव दोरगे (वय 29,रा. पाटील वस्ती यवत), अक्षय ईश्वर यादव (वय 27,रा. यादववाडी यवत), अभिषेक संतोष दोरगे (वय 24,रा. पिंपळाची वाडी यवत), हर्षल बाळू जगताप (वय 22,रा. कासुर्डी कामतवाडी यवत), विजय अनिल टेमगिरे (वय 25,रा.भरतगाव यवत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. किरण गायकवाड असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संशयित आरोपी दोरगे व गायकवाड हे यवत गावातील रहिवासी आहेत. त्यांच्यात अनेक वर्षांपासून गावातील पालखीच्या मानावरू वाद आहेत. गायकवाड हा 6 फेब्रुवारी रोजी त्याच्या मित्रांसमवेत जेजुर येथे दर्शनासाठी गेला होता. तेथुन परत येत असतानाच सागर व त्याच्या साथीदारांनी किरणला अडवून त्याला पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यानंतर त्यांनी किरणवर कोयत्याने वार केले. या घटनेनंतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत, हत्यारे उंचावुन दहशत निर्माण केली.

त्यामुळे नागरीकांनी घाबरुन त्यांची दुकाने बंद केली. दरम्यान, संबंधीत गुन्ह्यातील आरोपी फरारी झाले होते. हे आरोपी त्यांच्या कारमधून लोहीयानगर येथे त्यांच्या एका मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AgriStack Farmer ID Maharashtra : महाराष्ट्राची देशात मोठी भरारी! १.४४ कोटी शेतकऱ्यांची 'अ‍ॅग्रीस्टॅक' नोंदणी पूर्ण; उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कसा काढावा? कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

Honour Killing: साखरपुड्याच्या आदल्या दिवशी १९ वर्षीय तरुणीची हत्या; जन्मदात्या पित्यानेच आवळला गळा?

Latest Marathi News Live Update: एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे मुंबई हायकोर्टात आव्हान

Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

Property Card: फ्लॅट खरेदी-विक्री करायचाय? मग ही बातमी वाचाच! सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ७ कोटी घरमालकांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT