Pune crime sakal
पुणे

Pune : शेतक-यांचे सोयाबीन, गहु चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलीसांना यश; दोघांना अटक

त्यामध्ये ३ आरोपी हे विधीसंघर्षीत बालक असल्याने त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune - आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत शेतक-यांनी कष्ठाने पिकवलेले धान्य रात्रीचे वेळी शेतक-यांचे घराजवळुन चोरी करणा-या गुन्हेगारांची टोळी काही दिवसांपूर्वी सक्रिय झाली होती. सदर टोळीचा शोध घेणे बाबत आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी एक पथक तयार केले होते.

त्यांणा या गुन्हयाची गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली असता सदर आरोपींनी गुन्हयामध्ये वापरलेली मो. सा. गाडी नं एम.एच १४ जे क्यु ६९५८ हिच्या सह एक संशयीतास राजुरी येथील गणेश डेअरी जवळुन ताब्यात घेवुन धान्य चोरीचे गुन्हया बाबत चौकशी केली असता त्यानी सदर गुन्हयामध्ये एकुण ८ आरोपीं असल्याचे सांगीतल्याने तपास पथकाने त्यापैकी ५ आरोपींना राजुरी परीसरातुन ताब्यात घेवुन पोलिसांनी गुन्हा तपास केला.

त्यामध्ये ३ आरोपी हे विधीसंघर्षीत बालक असल्याने त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तसेच किरण उर्फ बॉडी शिंदे (रा आळे ता जुन्नर जि पुणे), ज्ञानेश्वर उर्फ आरडीएक्स वाव्हळ रा.आळे ता जुन्नर जि पुणे, रोहण चव्हाण रा.आळे ता जुन्नर जि पुणे पुर्ण नाव माहीती नाही.

हे ३ आरोपी अदयाप पर्यंत गुन्हयात वापरलेले पिकअप वाहनासह फरार असुन तपास पथक त्यांचा शोध घेत आहे तर अनिकेत अशोक घंगाळे (वय २० वर्षे रा राजुरी ता जुन्नर जि पुणे, गणेश व्यंको फुलमाळी वय १९ वर्षे रा राजुरी ता जुन्नर जि पुणे या २ आरोपींना जुन्नर न्यायालयामध्ये हजर करून ४ दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर झाल्याने सखोल तपास केला असता

सदर आरोपींनी आळेफाटा पोलीस स्टेशन हददीमध्ये गुन्हा केल्याचे कबूल करून सदर दाखल गुन्हयामध्ये राजुरी व आळे येथील एकुण ८ आरोपींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले तसेच धान्य चोरीसाठी त्यांनी आळे येथील एका पिकअप एम .एच. १४ के. ए .३७०९ या वाहनाचा व राजुरी येथील मोटार सायकल एम.एच १४ जे क्यु ६९५८ हिचा वापर केला असुन चोरीचे धान्य नगर जिल्हयात विक्री केल्याचे आरोपींनी सांगीतले.

सदरची कामगीरी ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घटटे ,उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर, पो. नि. यशवंत नलावडे साो, सहा पो. नि. सुनिल बडगुजर , पो.स.ई अनिल पवार, विकास गोसावी, प्रविण लोहोटे, सचिन कोबल, नविन अरगडे पो. मित्र निलेश शितोळे यांचे पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT