Crime News esakal
पुणे

Pune Crime : पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी तिने उचलले 'हे' पाऊल, पोलिसांची दिल्लीपर्यंत धावपळ

एका तरुणीने मैत्रिणीला येरवड्यातील एका तरुणाने पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime - एका तरुणीने तिच्या मैत्रिणीला तरुणाने दिल्लीला पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली. तिने मैत्रिणीचे दिल्लीतील लोकेशनही पोलिसांना पाठवले. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याच्या तक्रारीमुळे पुणे पोलिसांची झोप उडाली. पोलिसांनी थेट दिल्ली गाठली.

परंतु तपासादरम्यान ‘लव्ह जिहाद’चे हे प्रकरण बनावट असल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदार तरुणीने प्रियकर तिला त्रास देत असल्याची तक्रार केली होती. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचे समोर आले.

तर घडलेला प्रकार असा की, एका तरुणीने मैत्रिणीला येरवड्यातील एका तरुणाने पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. सध्या ‘लव्ह जिहाद’ चा बोलबाला सुरू आहे. या तरुणीच्या तक्रारीमुळे पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. चंदननगर पोलिसांनी तक्रारदार तरुणीकडे चौकशी केली.

तिने अपहरण झालेल्या तरुणीचे नाव, मोबाईल क्रमांक याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. परंतु तरुणीने दिलेला मोबाईल क्रमांक बंद लागत होता. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली. पोलिसांनी बंद मोबाइलचा डेटा काढला. त्यावरून पोलिस लोहगावमधील त्या तरुणीकडे पोचले.

परंतु तिला याबाबत काहीही माहिती नसून, मोबाईल चार महिन्यांपासून बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना तक्रारदार तरुणीवर संशय बळावला. तोपर्यंत तक्रारदार तरुणीने पोलिसांना विश्वास बसावा, यासाठी दिल्लीतील मैत्रिणीचे लोकेशन मागवले. ते अपहरण झालेल्या मैत्रिणीचे असल्याचे सांगितले.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून होते. त्यांनी लोकेशनच्या आधारे पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना केले. त्यानुसार पोलिसांना दिल्लीत ती तरुणी सापडली.

पोलिसांनाही या प्रकरणाचा तपास लागल्याचे वाटले. परंतु चौकशीदरम्यान त्या तरुणीने पुण्यातील मैत्रिणीला आपण हे लोकेशन पाठविल्याचे सांगितले. शेवटी पोलिसांनी तक्रारदार तरुणीला पोलिसी खाक्या दाखविला. त्यावेळी तक्रारदार तरुणीने आपणच पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी हे बनावट अपहरण नाट्य रचल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT